SHARE YOUR EXPERIENCE

Share Your Experience Of Kolhapur Medical Camp Here. For That Kindly Mail Your Experience To reshma.photo@gmail.com

Search This Blog

Sunday, February 13, 2011

2009 CAMP EXPERIENCE - BY SUHASINI GULAVANI

लेखिका - सुहासिनी गुळवणी
ह​रि ॐ
ह्या वर्षी मेडिकल कँप कोल्हापूर जील्हयातील व शाहूवाडी येथील पेंडाखळे हया गावी सम्पन्न झाला.
गेली पाच वर्षे हया गावातच सदर कँप होत आहे. हा कँप एकंदर दोन दिवसांचा होता -- 9, 10 फेब्रुवारी 09.

सोमवार दिनांक 9/2/2009 रोजी सकाळी 9.00 ते संध्याकाळी 7.00 वाजेपर्यंत सेवाकार्य पुढीलप्रमाणे.

1. जवळच्या खेडयांमध्ये जुने ते सोने वाटप
2. शर्टस, पँटस, सलवार, खमीज,साडया, गोधडी, स्वेटर्स, घरात उपयोगी भांडी
आरोग्याची काळजी व त्यासाठी लागणा-या वस्तुंचे वाटप
3. कॅपच्या जागेवरच रात्रीच्या जेवणानंतर सत्संगाचा कार्यक्रम.

मंगळवार दिनांक 10/2/2009 रोजी सकाळी 9.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत सेवाकार्य पुढीलप्रमाणे.

1. मेडीकल कँप
2. विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी व शाळेचे आणि खेळाचे वस्तुवाटप औषधांचे वाटप
3. अन्नपुर्णा महाप्रसाद

एकूण कार्यकर्ते - कोल्हापूरचे स्थानिक – 1576 आणि मुंबईचे 450
डॉक्टर्स - 138
पॅरामेडिकल स्टाफ - 108
एकूण खेडयांचा सहभाग - 56
एकूण कुटुंबे - 4744 पैकी पुरुष - 10753 आणि स्त्रीया – 11,439
एकूण गांवकरी – 22,192
शाळांची संख्या – 113
एकूण विद्यार्थी – (इयत्ता 1ली ते 9 वी ) 8,349

रविवारी दि. 8/2/09 रोजी सकाळी 6.30 वाजता प्रसाद ट्रॅव्हल्स टीळक ब्रीज जवळ हिंदू कॉलनी दादर पूर्व येथून बसेस सुटणार आहेत. ( एकूण 11 बसेस आणि 450 कार्यकर्ते मुंबईहून सेवेसाठी जाणार आहेत.) सकाळी 1ला थांबा खोपोली येथे असून तेथे सकाळचा नाश्ता चहासाठी बस थांबणार आहे. नंतर 2रा थांबा सातारा येथे आहे. येथे लँडमार्क मंगल कार्यालय येथे असून तेथेच दुपारचे जेवण होणार आहे. नंतर कोल्हापूर येथे एल.बी. लॉन इकडे संध्याकाळचे जेवण झाल्यानंतर तेथे रहाण्याची सोय केलेली आहे.
पहिला दिवस, ९ फेब्रुवारी २००९

दिनांक 9/2/09 च्या सकाळी सर्व कार्यकर्ते पहाटेपासूनच शिबीर स्थळी जाण्यासाठी उत्सुक होतेच व सर्वजण तयार होऊन मार्गस्थ झाले देखील. शिबीरस्थळी पोहचल्यानंतर असे दिसून आले की तिथला निसर्गरम्य परिसर आणि आतिशय दूर्गम असे ठिकाण पाहून प.पू.बापुंच्या हया अवाढव्य कार्याची महानता, भव्यता डोळयापुढून पुढे सरकू लागली. तीथल्या प्रत्येक कृतीतून जाणवणारे प्रेमळ बापू. तेथील बापूभक्तांना प.पू. बापुंच्या पादूका व उदीचा अलभ्य लाभ, आणि त्यातला परम योग म्हणजे तीथे झालेले प.पू.सूचितदादांचे व नंदामाईचे आगमन आणि तेथील सर्वांनाच त्यांचा मनसोक्त दर्शनाचा झालेले लाभ.

त्यानंतर सदगुरुंची प्रार्थना झाली. व सर्व कार्यकर्ते आपापल्या ग्रुपमध्ये जाऊन उभे राहीले.

जवळच्या खेडयांमध्ये जुने ते सोने वाटप
(शर्टस, पँटस, सलवार, खमीज,साडया, गोधडी, स्वेटर्स, घरात उपयोगी भांडी)

त्यानंतर जसजशी अनाउंसमेंट होत होती तसतसे प्रत्येक ग्रुपची नावं व त्यांच्याबरोबरचा जुने ते सोने वाटपाच्या वस्तुंचा टेंपो व गावांची नावे वाचली जात होती व ते सर्व आपापल्या कामासाठी बाहेर पडत होती. जुने ते सोने वाटपाची व्यवस्था इतकी चोख बजावलेली होती की प्रत्येक देण्याचे पॅकेट हे त्या त्या गावातील गावक-यांच्या नावाने तयार होते व बरोबर एक नावाची यादी देखील आणलेली होती. एक अनोखी वेगळी अशी ही सेवा होती. त्या त्या गावात गेलो की तीथली माणसे सर्वजण एकत्र येऊन बसलेली असायची. ती लगेचच गजर सुरु करायची. खुप आनंद वाटत होता. ते उत्स्फुर्त गजर असे होते.

1. तुला खंद्यावर घेईन । तुला पालखीत ठेवीन ।।
अनिरुध्दा मी मुंबईला । पायी चालत येईन ।।
तुझ्या मुंबई नगरात । माझा विठू मी पाहीन ।।
पायी चालत येईन । अनिरुध्दाला पाहीन ।।
अनिरुध्दाला पाहीन । माझं दुःख मी विसरीन ।
पायी चालत येईन । अनिरुध्दाला पाहीन ।।
2. युगे अठठाविस उभा । विठू विटेवरी ।।
भक्तांसाठी आला माझा । अनिरुध्द हरि ।।
3. अंगणी माझ्या तुळस । लावली हिरवीगार ग ।। (2 वेळा)
बघाया जाऊ माझ्या । बापूंचा संसार ग ।।
त्या तुळशीला घालूनी पाणी ।
पाणी घालुनी गेलीया जनी ।।
अंगणी माझ्या तुळस । लावली हिरवीगार ग ।। (2 वेळा)
बघाया जाऊ माझ्या । बापूंचा संसार ग ।।
त्या तुळशीला लावूनी कुंकू ।
कुंकू लावूनी गेलीया सखू ।।
अंगणी माझ्या तुळस । लावली हिरवीगार ग ।। (2 वेळा)
बघाया जाऊ माझ्या । बापूंचा संसार ग ।।
हया तुळशीला लाउनी बूक्का ।
बुक्का लावूनी गेलाय तूका ।।
अंगणी माझ्या तुळस । लावली हिरवीगार ग ।। (2 वेळा)
बघाया जाऊ माझ्या । बापूंचा संसार ग ।।
4. असा कसा बाई माझा भोळा अनिरुध्द ।
भक्तांसाठी आलाबाई खेडेगावात ।।
बुरंबाळ गाव कुणाला नसे ठावूक ।
बापुंमुळे भक्तांना या झाले ठावूक ।।
5. हातात धनूष्य बाण बाई मला लागले बापूंचे ध्यान ।।
गुरुमहाराजांनी नवलाई केली सूचित दादांनी बागेला नेली ।
हया बागेमंदी फूले कशाची ।
त्या बागेमंदी फूले चाफयाची ।
हातात धनूष्य बाण बाई मला लागले बापुचे ध्यान ।।
गुरुमहाराजांनी नवलाई केली ।
समिरदादाने बागेला नेली ।
त्या बागेमंदी फूले कशाची ।
त्या बागेमंदी फूले गुलाबाची ।
हातात धनुष्य बाण बाई मला लागले बापुचे ध्यान ।।
6. सुपात जोंधळं घोळीते 2 वेळा
जात्यावर दळण दळीते 2 वेळा
अंगणी तुळस पुजीते 2 वेळा
माझ्या बापूंचे चरण धरीते 2 वेळा
7. आई ग नंदामाता तुझा सोन्याचा ग झूबा ।
तुझ्या ग द र्शनाला राजा मुंबईचा उभा ।।
मुंबईचा राजा माझा आला ग भक्तांसंग ।
आला ग भक्तांसंग त्याला घ्यावं पदरात आई ग घ्याव पदरातं ।।
मुंबईचा राजा माझा आला ग पालखीतं ।
आला ग पालखीतं आई ग घ्याव पदारातं ।।
मुंबईचा राजा माझा आला ग दिंडीतूनं ।
आला ग दिंडीतून त्याला घ्यावं पदरातं ।।

अशा हया सर्व भाविक भक्तांकडून हे गजर ऐकून तर आम्ही फारच सुखावून गेलो होतो. त्यानंतर आम्ही जवळजवळ सर्व कार्यकर्ते संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत पुन्हा शिबीर स्थळी पोहोचलो होतो. ते तिथे आमझ्यासाठी त्यावेळी सुध्दा जेवण तयार होतेच. आम्हा सर्व भक्तांना ही माहेरची उबच मिळत होती.

कँपच्या जागेवरच रात्रीच्या जेवणानंतर सत्संगाचा कार्यक्रम

संध्याकाळी ठिक 7.00 वाजता प.पू.नंदामाई आणि सूचितदादांच्या सहवासात सत्संग सुरु झाला त्यावेळी त्या गावकरी भक्तांच्या आनंदाला उधाणच आले होते. सर्वत्र प.पू बापुंच्या जयजयकार आणि भक्तीरसाने वातावरण दूमदूमून गेले होते. तिथल्या धूळीने तर आकाशात सुध्दा भक्तीचा गंध पसरला होता। । त्यानंतर संध्याकाळी, पुन्हा दुस-यादिवशी लवकरात लवकर शिबीर स्थळी पोहोचावयाचे असल्याने आम्ही सर्व कार्यकर्ते ​विश्रातीच्या ठिकाणी गेलो.
दूसरा दिवस, १० फेब्रुवारी २००९

दूस-या दिवशी ठिक आठ वाजता आम्ही पुन्हा शिबीर स्थळी. मात्र आजचा कामाचा ढंग खूपच वेगळा ​दिसत होता. सर्व कार्यकर्ते आपापली बॅचेस लाऊन सेवेसाठी हजर झाली होती. प्रत्येक सेवेचा कौंटर वेगळा होता. सर्व डॉक्टर्स देखील अगदी वेळेत हजर झाली होती. वास्तविक आज त्यांचेच काम जास्त असणार होते.


दि. 10/2/09 रोजी सकाळी 9.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत सेवाकार्य पूढीलप्रमाणे चालू रहाणार होते.

दिंडी
सकाळपासूनच सर्व भक्तगण दिंडीमधून बापूरायाला गजर गात साद घालत होते, नाचत होते, आणि सर्व शिबीर स्थळ भक्तीमय वातावरणात उल्हसित झाले होते.

आरोग्याची काळजी व त्यासाठी लागणा-या वस्तुंचे वाटप

1. विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी व शाळेचे आणि खेळाचे वस्तुवाटप हयामध्ये 6 रंगांचे व 2 प्रकारचे विद्यार्थांचे युनिफॉम्स मुलांसाठी 4417 X 2 वाटले जातील. तसेच मुलींना 3551 X 2 प्रत्येकी वाटले जातील. तसेच 8349 स्लीपर्स, आणि 8349 कॅप्स वाटले जातील.
2. खेळाच्या वस्तु व खेळ – हयामध्ये 220 फूटबॉल, 220 हँडबॉल , रिंग्ज 440 दोरीच्या उडया 660 इतके वाटले जाईल.
3. औषधांचे वाटप: उवांचे औषध, कंगवे, फण्या, 9500 ,साबण – 9500, दात घासण्याची पावडर 9500 पॅकेटस , भांडी घासण्याची पावडर 9500 किलो, पाणी शुध्दीकरण औषध – 100 मिलीलीटर्सच्या 4744 बाटल्या , खरजेचे औषध - 100 मिलीलीटर्सच्या 4744 बाटल्या.
4. अन्नपुर्णा महाप्रसाद (मिक्स भाजी, मसालेभात, लोणचे, आमटी,शिरा).

आरोग्याच्या दृष्टीने तेवढेच आवश्यक असलेले अन्नपूर्णा महाप्रसाद हाही कौटर अतिशय महत्वाचा होता त्यामुळे तेथेही भरपूर कार्यकर्ते सेवेसाठी तत्पर होती. सकाळी साधारणपणे 10.00 वाजल्यापासून जेवणाच्या पंगती वाढल्या जात होत्या. त्या सुमारे दुपारी 4.00 वाजेपर्यंत चालू होत्या आणि सुमारे 65000 इतके भक्तगण प्रसादाचा लाभ घेवून आनंदाने परतली.

तेथील भक्तांचे अनुभव

1. नावे नोंदणीच्या ठिकाणी एक भक्त म्हणाला “आम्ही सरकारी अनुदान/मदत मिळते तेथेही जातो. तीथे सुध्दा लोकांची झुंबड उडते. इथे इतक्या प्रचंड प्रमाणात गर्दी असून देखील तुम्ही कसे नियंत्रण मिळवतात ? तिकडे तर दंडूका मारुन नियंत्रण मिळवतात.“ आम्ही म्हणालो करणारा तो केवळ एक बापूच आहे. कारण एवढया तीन दिवस पूर्ण भरघोस कार्यक्रमात कुठेही गडबड गोंधळ आढळून आलाच नाही.
2. काही भक्तगण म्हणाले की आम्ही दिवाळी साजरी करत नाही हे शिबीर म्हणजेच आमची दिवाळी असते. आम्हाला मात्र हे ऐकून आमच्या येथील प्रत्येक सणाला प.पू. बापुंच्या कार्यक्रमांची आठवण सुखाऊन गेली.
3. काही तेथील रहिवाशी भक्तगण म्हणाले की आमच्या कडे बापू येण्यापूर्वी आमच्यात खूप भांडणं होत असत. परंतु आता एवढा फरक झाला आहे की आम्ही सर्वजण आमच्या सर्वांची काळजी घेतो आणि एकमेकांना मदतही करतो. आम्ही सांघीक उपासना करतो.
4. तसेच आमच्या इथे देवदासी प्रथा चालू होती तीही आता पूर्णपणे बंद झाली आहे.
5. जुने ते सोने वाटप करतेवेळी एका बाईंना काहीही मिळाले नाही तर आम्हाला वाटले की हया बाई आता काहीतरी तक्रार करणार परंतु त्या बाईंचे उत्तर अगदीच निराळे मिळाले. त्या बाई म्हणाल्या की आता नाही मिळाले तर काय झाले. आमचा बापू पुढच्या वर्षी नक्की देईल.

त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता कँप संपल्यानंतर आता सर्वांना घरी जाण्याची गलेली घाई. सर्व भक्त आवराआवर करु लागली तेंव्हा आमच्या प.पू. नंदाई गुरुकुलाच्या बाहेर येऊन सर्वांना उद्देशन म्हणाल्या की "माझ्या बाळां नो तुम्ही खूप दमलात ना. खुप छान कार्यक्रम झाला. तुम्हाला काही बरे वाटत नसले तर बाप्पा तुमची काळजी घेणारच आहे. त्यांचे स्मरण करा. तुमचे हे सेवेचे गाठोडे घेऊन मी देवाकडे जाणा आहे". हे ऐकून मात्र सर्व कार्यकत्यांचे हदय आणि मन हेलावले आणि डोळयांच्या कडा पाणावल्या.

त्यांनतर सर्वांच्या परतीच्या प्रवासाची सोय श्री. वैभवसिंह व श्री. अजीतसिंह बघत होते. ते सांगतील त्याप्रमाणे सर्व कार्यकर्ते लाईनीने सांगतील त्या बसमधून बाहेर पडत होते.
असा हा आमचा ​​​​शिबीर कार्यक्रम सर्व आठवणी साठवून समाप्त झाला. पण पुढल्या वर्षीच्या शिबीराची वाट पाहात... सरते शेवटी आद्य पिपांच्या 2 ओळी आठवतात –

नित्य घडो तुझी सेवा । बापू हाचि माझा मावा ।।
सर्व तुच माझा ठेवा । बापू हाचि माझा कावा ।।
।।हरि ॐ ।।

No comments:

Post a Comment

HARI OM