कोल्हापूर मेडीकल कॅम्प २०११ अनुभव
प्रेमाचा कॅम्प
KETAKIVEERA KULKARNI |
- केतकीवीरा कुलकर्णी
ktkool.k@gmail.com
दरवर्षी कोल्हापूर वैद्यकिय शिबिराबद्दल ऐकून ऐकून या बद्दल खूप कुतुहूल वाटू लागले होते. हा कॅम्प कसा असेल, कसे लोक असतील, हे सर्व पाहण्याची इच्छा झाली होती. आपल्याला कधी ह्यात सहभागी होत येईल असे नेहमी वाटायचे आणि बापू कृपेने या वर्षी मला ही संधी मिळाली. २९ जानेवारी ते ३१ जानेवारी. ज्या दिवसची आम्ही सर्वजण अगदी आतुरतेने वाट बघत होतो. तो दिवस अखेर आला. २९ जानेवारी २०११. आम्ही सगळे या दिवशी सकाळी हरिगुरुग्राम येथे जमलो. मुंबईवरुन १६ बस निघणार होत्या. प्रत्येक जण आपल्याला दिलेल्या बसमध्ये बसून कोल्हापूरला जाण्यास निघाले. कॅम्पचा हा पहिला दिवस संपूर्ण प्रवासमध्ये गेला. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण खुपच सुंदर होते, रात्रीचे जेवण तर अप्रतिम होते. खाण्या-पिण्याची आणि राहण्याची खूपच सुंदर सोय होती. रात्री झोपण्यासाठी आम्ही सर्वजण आमच्या जागेवर गेलो. संपूर्ण दिवस प्रवास करुन देखिल थकवा मात्र कुठेही जाणवला नाही.
लगेच दुसर्या दिवशी आम्ही लवकर उठून कॅम्प साईटवर जाण्यासाठी तयारीला लागलो. ह्या दिवशी प्रत्येक गावामध्ये जाऊन वाटप करायचे होते. प्रत्येकाला वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये डिव्हाईड केले होते. त्य ग्रुप्सनुसार ३ ते ४ गावांमध्ये जायचे होते. टेम्पोमध्ये बसून आम्ही तेथील गावांमध्ये गेलो. तिकडे गेल्यावर त्या लोकांच्या चेहर्यावरचा आनंद बघण्यासारखा असतो. वाटप करत असताना सगळी छोटी मुलं गजर घेत होती. मुलं, बायका सगळेच संत्संगात बेभान होत होती. त्यांनी रचलेले गजर, अभंग खरोखरच खुपच सुंदर होती. प्रत्येक घरामध्ये त्या त्या व्यक्तीला लागणारे कपडे, टिकल्यांचे पाकीट, बांगड्या, पाणी स्वच्छ करण्याचे औषध, साबण, कंगवा इत्यादी वस्तूंचे एक गाठोडे त्यांना दिले गेले. त्याचब्रोबर ज्यांना नऊवारी साड्या लागतात त्या सर्वांसाठी नवीन साड्या दिल्या गेल्या. काही गावांमध्ये ८० ते ९० लोक, काही ठीकणी जवळपास २५० लोक होते, पण कुठेही कसलाही गोंधळ नव्हता, सगळ मिळाल्यावर त्या लोकांना खूपच आनंद होत होता. वाटप संपले आणि रात्री सत्संगाचा कार्यक्रम.
सत्संग तर अप्रतिम होता. बापू, दादांवर रचलेले अभंग, आईचा गोंधळ, गजर हे सगळे एवढे सुंदर रचले होते आणि विशे़ष म्हणजे रामराज्य येण्यासाठी / आणण्यासाठी आपल्या बाप्पाने आपल्याला काय काय करायला सांगितले आहे, आपण काय केले पाहिजे यावर फक्त तीन दिवसांमध्ये १३ कडव्यांचा रचलेला अभंग. हे सगळं ऐकल्यावर वाटू लागले आप्ण यातल्या किती गोष्टी करतो. बापूंचे आपण किती ऐकतो, इथल्या लोकांनी तर बापूंना बघितलेले सुद्धा नसते. तरी देखील त्यांचे बापूंवर किती प्रेम आहे. खरोखर हेवा वाटतो या लोकांचा आणि बापूंवरील त्यांच्या प्रेमाचा.
शिबिराच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ३१ जानेवारीला मला विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अन्नपूर्णा प्रसादम येथे सेवा होती. सकाळी ११.३० च्या सुमारास मुलांच्या जेवणास सुरुवात झाली. सगळी मुलं अगदी व्यवस्थित कुठेही घाई गडबड न करता रांगेत बसत होती. नंदाई स्वतः त्या मुलांना वाढत होती, भरवत होती. "वदनी कवळ घेता" हे म्हणून झाल्यावरच सगळे जेवायला सुरु करत होती. भरपूर जेवत होती आणि मुख्य म्हणजे ताटात वाढलेलं काहीही टाकत नव्हती. अन्नाच कण जरासुद्धा वाया घालवला नाही. ते सगळं बघितल्यावर अन्नाची किंमत कळते. आपल्याला इकडे सगळ्या सुविधा आहेत, सगळं मिळतं तर आपण सगळं फुकट घालवतो. अजूनही काहींना शिरा हा प्रकार माहित नव्हता. काही जण घरी बांधून घेऊन जात होती. नंतर दुपारी २.३० ते ३.०० पर्यंत सर्व मुलांचे जेवण आटपून गावकर्यांना जेवायला वाढण्यात आले व हे सगळं संपल्यावर संध्याकाळी "जयंती मंगला काली" या गजरावर सगळ्यांनी नाचायला सुरुवात केली. प्रत्येकजण या गजरामध्ये अगदी बेभान होऊन नाचत होता आणि तिकडे उपस्थित असलेल्या जवळ जवळ प्रत्येकानेच यामध्ये सहभाग घेतला.
आणि कॅम्पचा शेवटचा दिवस संपला. आता तिकडून निघायची वेळ जवळ आली होती आणि तिकडून निघावेसे वाटत्च नव्हेत. पण त्याच बरोबर त्या लोकांनी आपल्यासाठी आपल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त क़ष्ट घेतल्याची जाणीव देखिल होत होती. एवढी मोठी भातशेतीची जमीन एवढ्या सुंदरपणे सारवली होती. चालताना कसलाही त्रास जाणवत नव्हता. त्याचबरोबर पाण्याची साठवण, जमीन सारवण्यासाठी शेण गोळा करणे, चूल पेटविण्यासाठी लाकडं साठवून ठेवणे, सगळ्यांना जेवायला देण्यासाठी स्वयंपाक करणे, कुठल्याही प्रकारचा त्रास त्यांच्या चेहर्यावर दिसत नाही. आणि एवढे करुनही कुठेही अहंपणा नव्हता. या कॅम्पमधून त्या गावांमधल्या लोकांना बघून खरोखर बापूंवर कसे प्रेम करायचे हे समजलं आणि ही संधी मला मिळाली. अशीच कृपा आमच्या सर्वांवर राहो हीच बापू चरणी प्रार्थना. I LOVE YOU BAPU, AAI, DADA
हरी ॐ